🅿🅰🅿🅰🅿🅰🅿🅰🅿🅰🅿🅰
*मोबाईलचा डाटा/नेट जलद गतीने (लवकर) संपत असेल तर मोबाईल मध्ये कोणती सेटिंग करावी?*
मोबाईल चेंज केल्यानंतर,नवीन घेतल्यानंतर,रिसेट किंवा फाॕरमेट केल्यानंतर फक्त व्हाट्सअप किंवा फेसबुक वापरल्या नंतर किंवा कोणताही व्हीडीओ न पाहता किंवा डाऊनलोड न करता जर आपल्या मोबाईल मधील डाटा/नेट जलद गतीने लवकर संपत असेल तर आपणास आपल्या मोबाईल मध्ये खालील प्रमाणे सेटिंग करायला हव्यात.यामुळे आपला डाटा/नेट मध्ये बचतच होईल.
1) सर्व प्रथम आपला डाटा कोठे जास्त खर्च होतो ते बघा.त्यासाठी मोबाईल SETTING मध्ये जाऊन DATA USAGE -- MOBILE DATA USAGE यामध्ये जावे येथे आपणास सर्वात जास्त डाटा फोटो,व्हाट्सअप,फेसबुक ,युट्यूब,गुगल क्रोम,प्ले स्टोअर किंवा ईतर अॕप यापैकी कोठे खर्च होतो ते कळेल.
2) युट्यूब वर व्हीडीओ पाहतांना योग्य क्वालीटीची निवड करावी.यासाठी जो व्हीडीओ बघाल त्याच्या उजव्या बाजुला तीन टिंब दिसतील त्यावर क्लीक केले असता आपणास क्वालीटी आॕप्शन दिसेल.तेथुन व्हीडीओ क्वालीटी शक्यतो 360 किंवा 240 P ठेवावी.
युट्यूब व्हीडीओ आॕफलाईन पाहण्यासाठी आपण कधीकधी ते डाऊनलोड करतो त्याची पण क्वालीटी SETTING मधील GENERAL किंवा DOWNLOAD ह्या आॕप्शन मधुन 360/240 P ठेवावी.
3) व्हाट्सअप सेटिंग खालीलप्रमाणे करावी.
WHATSAPP -- SETTING --DATA AND STORAGE USAGE येथुन PHOTO,AUDIO,VIDEO,DOCUMENT यावरील चेक मार्क (बरोबर ची निशाण) काढुन टाकावा.
WHATSAPP -- SETTING --- CHAT --- BACKUP TO GOOGLE DRIVE घ्यायचा नसेल तर NEVER ला क्लीक करा.BACKUP घ्यायचा असेल तर MONTHALY/WEEKLY हा पर्याय निवडून BACKUP ONLY WI FI हा पर्याय निवडावा.
4)प्ले स्टोअरची AUTO UPDATES SETTING ही प्ले स्टोअरच्या SETTING मधून बंद करावी.जे अॕप अपडेट करायचे असेल तेच निवडून त्यालाच अपडेट करा.
5) CLOUD APPLICATION म्हणजे GOOGLE PHOTOS,GOOGLE DRIVE,DROPBOX मोबाईल मधील एखादे EXTRA STORAGE APP यांची AUTO BACKUP & SINC ही सेटिंग या अॕपच्या मुख्य SETTING मधुन बंद करावी.
6) मोबाईलचे HOTSPOT अनवधनाने चालु असेल तर ते बंद करावे.
*संगणक/लॕपटाॕप/मोबाईल/साॕफ्टवेअर/सरल याविषयीच्या अधिकाधिक माहीती साठी कृपया माझा व्हाट्सअप मोबाईल नंबर आपल्या स्थानिक गृपला अॕड करावा,ही विनंती*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment